अचानक धिर मिळाला
वडील गेले तेव्हापासून जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा आमच्याकडे पाठ फिरविली. कर्मयोगी फाऊंडेशनने जो विधवा महिलांच्या मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सायकल वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे तो खूप छान आहे. आजपर्यंत माझी छोटी बहीण शाळेमध्ये जायला साधन नसल्यामुळे कोणाच्यापन गाडीवर बसून शाळेत जायची कधी कधी गाडी न मिळाल्यामुळे घरी परत यायची आणि रडायची आणि म्हणायची आज जर बाबा असतें तर मला शाळेत गाडीने सोडून दिले असतें नाहीतर शाळेत जायला सायकल तरी घेऊन दिली असती अश्या या परिस्थिती मध्ये असतांना कर्मयोगी फाऊंडेशनने आम्हाला प्रेमाची सावली मायेची माया माझ्या बहिणीला शाळेत जायला सायकल दिली त्याबद्दल कर्मयोगी फाऊंडेशनचे खूप खूप आभार
नाव – वैष्णवी आत्माराम लिडबे
पत्ता – रा.बीबी ( सावळी )पोस्ट – कान्होलीबरा, ता. हिंगणा, जि. नागपूर
अचानक धिर मिळाला
RELATED ARTICLES