उमेश सोरते यांची अवर सचिव पदी निवड गडचिरोली तालुक्यातील वसा येथील उमेश केशव सोरते यांचे नुकतेच मंत्रालय मुंबई येथे अवर सचिव (विधि) गट अ या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई ने निवड केली आहे. सध्या ते सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ या पदावर न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) आष्टी जि. वर्धा येथील न्यायालयात कार्यरत आहेत. त्याआधी ते गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी वकिलीचा व्यवसाय करत होते. उमेश सोरते यांची घरची परिस्थिती हलाखीची, शेतकरी कुटुंबातील असल्याने शासकीय नोकरी मिळवण्यासाठी त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागले. ते सहाय्यक सरकारी अभियोक्ता असताना सुद्धा त्यांच्यामध्ये खूप जिद्द व चिकाटी असल्यानेच या पदावर पोहोचू शकले. सन 2017 पासून सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट-अ या पदावर न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) आष्टी जि. वर्धा या न्यायालयात कामकाज पहात आहेत. याआधी सुद्धा त्यांनी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तसेच जिल्हा न्यायाधीश पदाकरिता मुलाखत दिलेली होती, मात्र परीक्षांमध्ये अगदी थोड्या मार्कांनी चांगली संधी हुलकावणी देत होती. या अपयशामुळे न खचता आयुष्याच्या खडतर प्रवास कायम ठेवून आपल्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी सतत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून उच्च पदाच्या परीक्षा देण्याचा निर्णय ठाम ठेवला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखती घेऊन त्यामध्ये उत्तम प्रकारे यश संपादन करून उमेश सोरते यांची नुकतीच मंत्रालय मुंबई येथे अवर सचिव विधी गट अ या पदी निवड झाली आहे. यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, काका-काकू, भाऊ-बहीण व मित्रपरिवार यांना दिले आहे.
उमेश सोरते यांची अवर सचिव पदी निवड
RELATED ARTICLES