कर्मयोगीचा ५१ गावात आधारकाठी वाटपाचा श्रीगणेशा…
कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे २०२१ ते २०२२ या दोन वर्षात जवळपास ७० गावातील वृद्ध मंडळींना आधार काठी (कुबळी) देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले. नवीन वर्षाच्या सुरवातीला कर्मयोगी तर्फे २०२३ मध्ये सुद्धा ५१ गावांतिल वृद्ध मंडळीना आधार काठी वाटपाचा संकल्प करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर दिनांक २१ जानेवारी २०२२ ला रामा गावी या लोककल्याणकारी संकल्पाचा श्रीगणेशा करून २१ व २२ जानेवारी ला रामा, हळदगाव, भांसोली, वडगाव बक्क्षी या गावातील ७१ वृद्ध मंडळींना आधार काठी देऊन त्याना प्रेमरूपी आधार देण्यात आला रामा येथील कार्यक्रमाला रामा गावच्या सरपंच साधना माथनकर तर हळदगावच्या कार्यक्रमाला सरपंच दिगंबर धामणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी दिगंबर धामणे म्हणाले की आम्ही कर्मयोगी फाऊंडेशनच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करून जितकं जमेल त्या प्रमाणात गावातील लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करू व मी ईश्वराला प्रार्थना करतो की कर्मयीगीतील मंडळींप्रमाणे कन्या पुत्र लोकांच्या घरी जन्माला यावे…
या कार्यक्रमाला गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती..
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी यशस्वी मेहनत घेतली..