. .*कर्मयोगीची मातृदिनी कृतीमय गुरुदक्षिणा..*
◆ *जागतिक मातृदिनानिमित २५ सायकलचे वाटप.*
◆ *कर्मयोगी कडून १०० सायकल
वाटप पूर्ण..*?
कर्मयोगी फाऊंडेशनने विधवा ताईंच्या मुलींसाठी व विशेषतः कोरोना काळात आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढविण्याकरिता व आपल्यालाही कोणाचा तरी आधार आहे ही जाणीव करून देण्यासाठी १०१ सायकल वाटपाचा संकल्प केला होता, परंतु गरजवंताची गरज लक्षात घेत संकल्प १५१ सायकल वाटपाचा करण्यात आला आहे. या संकल्पाचा चौथा टप्पा
आई म्हणजे देवाचं दुसर रूप, आई म्हणजे प्रेमाचं मूर्त रूप त्या आईचा सन्मान करत, मातृत्व, मातृभाषा जपत जागतिक मातृदिनाचे औचित्य साधत केईसी ट्रेनिंग सेंटर बुटीबोरी येथे आई किंवा वडिलांचे छत्र हरवलेल्या गरजवंत मुलींना २५ सायकली देऊन या मुलींच्या आईंना आपली आई समजून कर्मयोगीने जागतिक मातृदिनी कृतीतून गुरुदक्षिणा दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे, उदघाटक उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या डॉ. रेखा बाराहाते, प्रमुख उपस्थितीत सुनील खोब्रागडे, डॉ.विनय बाराहाते,,आदित्य मिश्रा ही मंडळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होती…
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. रमेश ठाकरे म्हणाले की कर्मयोगी फाऊंडेशनचं कार्य
अतिशय कौतुकास्पद आहे. ते म्हणाले रंजल्या गांजलेल्या लोकांची सेवा करणारे साधू, देव साक्षात कर्मयोगी मध्ये कार्यरत आहेत. खऱ्या अर्थाने शून्यातून समाजसेवेचा वटवृक्ष कर्मयोगीने उभा केला आहे, त्यामुळे कर्मयोगीच्या या कार्याला मी नमन करतो असे ते म्हणाले. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये असणारे सुनील खोब्रागडे म्हणाले की बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले या म्हणी प्रमाणे कर्मयोगी फाऊंडेशनचे कार्य आहे. या कार्यक्रमाला येऊन मी धन्य झालो. भविष्यात मी सदैव कर्मयोगीच्या पाठिशी उभा राहील.
या कार्यक्रमाला राजू गावंडे, मुरली पणपालिया, दिनेश इंगोले, गणमान्य मंडळी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली…