कर्मयोगीने कृतीतून साजरा केला कामगार दिन..
★ ठेकेदारीत काम करणाऱ्या ५ कामगारांच्या मुलींना शिक्षणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत..
★ ५ महिला कामगारांचा सन्मान..
★ भव्य बुंदा वाटप..
कर्मयोगी फाऊंडेशनने आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वाप्रमाणे कामगार दिन व महाराष्ट्र दिन कृतीतून साजरा केला. बुटिबोरी औद्योगिक क्षेत्र स्थापन होऊन जवळपास ३५ वर्ष झाले पण
येथे आजपर्यंत कोणीही कामगार दिन साजरा करत नोव्हतें. ही बाब लक्षात घेवून बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र भरभराटीस आणण्यासाठी ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं , कंपनीच्या भरभराटीस्तव प्रसंगी अनेकांची प्राणज्योत मावळली, अनेकांना कायमचं अपंगत्व आलं अशा सर्व कामगार बांधवांप्रती, व ज्या बुटीबोरी भूमीने अनेकांना सुखसमृद्धीचे दिवस आणले त्या भूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करत १ में कामगार दिन मेट्रो चौक बुटिबोरी येथे २०२२ पासून कृतीतून साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी सुद्धा मेट्रो चौक बुटीबोरी येथे
आपल्या कार्यात सातत्य राखत
ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांच्या रितू बालाजी चौधरी, कांचन अनंतराव ताले, प्राची राजू मेश्राम, श्वेता संजय भोयर, प्रसन्नी बनवारी पाल या शिक्षणात हुशार असणाऱ्या ५ गरजवंत मुलींना प्रत्येकी ५ हजार रुपये या प्रमाणे २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. सोबतच कामगार क्षेत्रात आपल्या परिस्थितीवर मात करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिला कामगारांना शाल श्रीफळ, गुलाबपुष्प व गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले, तर कामगार दिनी बुंदा वाटप करून कार्यक्रमाचा शेवट गोड करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. मोतीलालजी चौधरी, कार्यक्रमाचे उदघाटक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आंतर्विद्या अभ्यासक्रमाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू विशेष उपस्थिती मध्ये वरिष्ठ पत्रकार वसंतराव बडनेरकर गुरुजी,
पीपल रियलिटीज बुटीबोरीचे व्यवस्थापकीय संचालक बी. यु. पारधी
कामगार नेते यजेंद्रसिंह ठाकूर व चंद्रशेखर निकोसे ही सर्व मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मोतीलालजी चौधरी म्हणाले की कर्मयोगी फाऊंडेशनने खऱ्या अर्थाने आज कृतीतून कामगार दिन साजरा केला आहे. कर्मयोगी मध्ये कार्य करणारे सदस्य हे कर्मठ कर्मयोगी आहेत. गावागावात असे कर्मठ कर्मयोगी या संस्थे मार्फत निर्माण झाल्यास अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविता यईल असे ते आवर्जून म्हणाले..
यावेळी उदघाटक डॉ. प्रशांत कडू म्हणाले की हा देशच कामगारांनी उभा केला आहे. कामगार व शेतकरी वर्गाशिवाय हा देश चालूचं शकत नाही.
जेव्हा कामगार क्षेत्रातले कर्मयोगी मध्ये कार्य करणारे कामगार हे सतत दुःखीकष्टी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फूलविण्यासाठी प्रयत्नशील असतात तेव्हा प्रत्यक्षात माणुसकीचे कर्मयोगी फाऊंडेशनमध्ये दर्शन होते..
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली..