HomeMost Popularकर्मयोगीने फुलविले १०१ वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य...

कर्मयोगीने फुलविले १०१ वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य…

कर्मयोगीने फुलविले १०१ वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य…
★साठी ओलांडलेल्यांना दिला काठीचा आधार..
कर्मयोगी फाऊंडेशनने २०२२ मध्ये ५१ गावांमध्ये वृद्ध मंडळीना आधार काठी वाटपाचा निर्धार केला आहे. त्याच अनुषंगाने “बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर दिनांक ३०जुलै २०२२ ला विठ्ठल रुक्मिनी मंदिर टाकळघाट तहसील हिंगणा जिल्हा नागपूर येथील १०१ वृद्ध मंडळीना आधार काठी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमरूपी हास्य फुलविण्यात आले..
या कार्यक्रमाचे अध्यक्ष टाकळघाट ग्रामच्या सरपंच शारदा शिंगारे, उदघाटक विठ्ठल रुक्मिनी मंदिर टाकळघाटचे अध्यक्ष शंकरराव खोडके, प्रमुख उपस्थितीमध्ये हिंगणा पंचायत समितीच्या उपसभापती
सुष्मा कडू, हिंगणा पंचायत समितीचे माजीउपसभापती हरीचंद्र अवचट, सामाजिक कार्यकर्ते महेश अवचट, प्रेरणा कॉन्व्हेंटचे व्यवस्थापकीय संचालक गणेश सोनटक्के हे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सरपंच शारदा शिंगारे म्हणाल्या की कर्मयोगी फाऊंडेशन हे आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वाप्रमाणे बोलून न दाखविता प्रत्यक्ष कृतीतून गोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. आमच्या गावात त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्य केले आहे. महाराष्ट्र राज्यात सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात अविरत कार्य करणारी दुसरी संस्था नसेल,
त्यामुळे त्यांना या कार्यात अधिक यश मिळावं अशी मी विठ्ठल रुक्मिनी चरणी प्रार्थना करतो असे त्या आवर्जून म्हणाल्या..
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी यशस्वी मेहनत घेतली..

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular