HomeMost Popular*कर्मयोगी लावून देणार गोरगरीब, अनाथ, शेतकरी, शेतमजूर मुलामुलींचे लग्न..*

*कर्मयोगी लावून देणार गोरगरीब, अनाथ, शेतकरी, शेतमजूर मुलामुलींचे लग्न..*

*कर्मयोगी लावून देणार गोरगरीब, अनाथ, शेतकरी, शेतमजूर मुलामुलींचे लग्न..*
कर्मयोगी फाऊंडेशन हे आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वानुसार गोरगरीब, दुःखीकष्टी, विशेषतः महिला सक्षमीकरणावर मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. त्याचाच भाग म्हणजे आतापर्यंत विधवा महिलांना ५२ शिलाई मशीन वाटप, कोरोना काळात आई किंवा वडील मरण पावलेल्या मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी १५१ सायकलचे वाटप, ५००विधवा महिलांना साडीचोळी वाटप, मुलींना शैक्षणिक आर्थिक मदत यासारखे अनेक उपक्रम महिलांसाठी राबविले आहेत.
कोरोना काळात गरीब घरातील ज्या मुलामुलींचे आई वडील मरण पावले. तसेच अनाथ मुले, किंवा ज्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे, अशा शेतकरी शेतमजूर वर्गातील मुलामुलींचे लग्न सामूहिक विवाह पध्दतीने लावून देण्याचे कर्मयोगी फाऊंडेशनने ठरविले आहे.
या सामूहिक विवाह कार्यक्रमच्या नियोजना बद्दल सांगताना कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे सांगतात की प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हे फार महत्वाचं असतं. आपलं लग्न हे खास असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण परिस्थितीमुळे ते काही शक्य होत नाही. आणि मुलीच्या बाबतीत तर लग्न म्हणजे एक प्रकारचा सोहळाच असतो. प्रत्येक मुलीचे आई वडील तिच्या लग्नासाठी तिच्या जन्मापासूनच सगळ्या सोयी करत असतात, आणि अचानक कोरोना सारखी परिस्थिती निर्माण होते. आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. या काळात अनेकांचे आई वडील काळाच्या पडद्याआड गेले. तसेच विदर्भातील शेतकरी, शेतमजूर यांच्या परिस्थितीचा विचार करता कर्मयोगी फाऊंडेशनने सामुहिक विवाह आयोजित करायचे ठरविले आहे. त्यासाठी इच्छुक मंडळींनी दिनांक २० मे ते १५ जून २०२२ पर्यंत कर्मयोगी फाऊंडेशनचे सरचिटणीस शिवाजी बारेवार ९०११७७९००९, संघटन प्रमुख नाशिर शेख ९३७३०२९८२४ यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर जुलै २०२२ च्या पहिल्या आठवड्यात नोंदणी झालेल्या मुलामुलींचे लग्न आदर्श पध्दतीने बुटीबीरी नागपूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लावून दिल्या जाईल.
या गोरगरीब मुलामुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी, त्यांना आयुष्यातील सर्वात सुखद अनुभव देण्यासाठी दानशूर मंडळीनी या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य करण्याचे आव्हान कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे…

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular