कर्मयोगी २०२३ मध्ये आपल्या संकल्पीय उपक्रमातुन दुःखीकष्टी गरजवंत लोकांना देणार प्रेमरूपी आधार…
*५१ सायकल वाटप, ५१ शिलाई मशीन वाटप, ५१ गावात आधार काठी (कुबडी वाटप), ५१ फुटपाथवर काम करणाऱ्या लोकांना छत्री वाटप, ५१ विधवा महिलांना नवरात्रात साडीचोळी वाटप…*
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर या कर्ते व्हा या तत्वावर सातत्याने दुःखीकष्टी गोरगरीब लोकांना सत्य, सातत्य, समर्पण शिस्त हे गुण अंगीकारून सेवा देण्याचं कार्य करत आहे.
२०२३ मध्ये सुद्धा कर्मयीगीने नुकत्याच पार पडलेल्या जानेवारीच्या मासिक सभेमध्ये मोठे संकल्प घेण्यात आले आहेत. त्यासाठी २०२३ ची थीम ठरविण्यात आली आहे.
२०२३ मध्ये कर्मयोगीचं एकच ध्येय ..
आत्मीयतेने प्रत्येकाला भेटूया,
मदतीचा, प्रेमाचा दीप लावूया
आनंदाचे जिव्हाळ्याचे वाटेकरी होवूया..
याच अनुषंगाने कर्मयीगीने २०२३ मध्ये अनाथ, आईवडील नसलेल्या गरजवंत मुलामुलींना शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी ५१ सायकल वाटपाचा संकल्प, विधवा महिलांना आत्मनिर्भर करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ५१ शिलाई मशिन वाटपाचा संकल्प, वृद्ध मंडळींना प्रेमरूपी आधार देत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी ५१ गावात आधार काठी ( कुबडी) वाटपाचा संकल्प, फुटपाथवर व्यवसाय थाटणाऱ्या गरजवंत छोट्या व्यावसायिकांना मायेची सावली देण्यासाठी ५१ छत्री वाटपाचा संकल्प,
नवरात्र उत्सवात ५१ विधवा महिलांना साडीचोळी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा संकल्प व लोककल्याणासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहेत.
या आधी २०२२ मध्ये सुद्धा कर्मयोगीने आईवडील नसलेल्या मुलींना १५१ सायकल वाटप २०२१ मध्ये ५२ शिलाई मशीन वाटप, आतापर्यंत ७० गावात आधारकाठी (कुबडी) वाटप, फुटपाथवर काम करणाऱ्या लोकांना १०१ छत्री वाटप, ५०० पेक्षा जास्त विधवा महिलांना नवरात्रात प्रत्येकी एक हजार रुपयांची साडी देऊन सन्मानित केले, व लोककल्याणासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले..
२०२३ मधील संकल्पाबाबत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे सांगतात की आम्हाला आमच्या जीवनाचा अर्थ, जीवनाचे महत्व, शिक्षणाचे महत्व समजले आहे. त्यामुळे कर्मयीगीला मिळवायचं नाहीं तर खूप मोठं कार्य उभारायच आहे की त्यात लाखोंचे संसार उभे केल्या जातील. माणसात असलेल्या पूर्णत्वाचं प्रगटीकरण म्हणजे शिक्षण, हे शिक्षण पैसा कमविण्यासाठी नव्हे तर जीवनाचा त्याग करण्यासाठी शिकविले जाते. त्याचेच अनुकरण करून आम्हाला आमचे जीवन तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन जगायचे आहे, त्यामुळे आयुष्याचा क्षणक्षण आम्हाला अवघ्यांच्या सुखासाठी द्यायचा आहे. ही आमची समाजसेवा नाही, किंवा आम्ही कोणावरही उपकार करत नाही, कारण ते आमचे कर्तव्य आहे, ईश्वराने त्यासाठी आम्हाला भरभरून दिले आहे, त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करत कार्यरत राहून जीवन जगणे हाच एकमेव उद्देश कर्मयीगीने ठरविला आहे. त्यामुळे २०२३ मध्ये कर्मयोगी माणुसकीची ज्योत लावत मोठ्या प्रमाणात दुःखीकष्टी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणार आहे.. आमची संस्था ही मानव जन्माचा अर्थ समजलेल्या २१ लोकांची अतिशय छोटी त्यातही जास्तीतजास्त औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संस्था आहे. त्यामुळे हे सर्व उपक्रम विविध टप्प्यात राबविण्यात येतील.
कर्मयीगी नो डिमांड ओन्ली आचिव्हमेंट या प्रमाणे कार्य करत आहे. ज्यांना कर्मयोगीचे कार्य योग्य वाटते अशा दानशूर मंडळींनी गोरगरीब दुःखीकष्टी गरजवंत लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी , कर्मयोगी फाऊंडेशनच्या IFSC CODE:-UBIN0564001 बचत खाते क्रमांक:-161410100129773 या बँक खात्यावर या कार्याला भरभरून आर्थिक मदत करून आपल्या मानवी जीवनाचे सार्थक करा असे ते म्हणाले..