JBT आवाज TV NEWS CHANNEL कबिर धर्माजी निकुरे गडचिरोली जिल्हा ब्यूरो चीफ 9021567333
– नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पाडण्यास सर्वच पक्षाचे सरकार जबाबदार आहेत का?जनतेला मुर्ख बनविणे बंद करावे म्हणून जनहित याचिका न्यायालयात दाखल न करता 52 दिवसांपासून केवळ आंदोलन करून पक्षाचे राजकारण करत आहेत, व आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांकडेच भीक मागत आहेत. असे दिसते आहे न्याय मिळत नाही मग न्यायालयातच जावे लागते.अंबाझरीच्या एकाच सरकारी जागेमध्ये उजव्या बाजुचे 50-60 वर्षांपासून असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बुलडोझर लावून पाडले जाते, आणि त्याच सरकारी जागेमध्ये डाव्या बाजुला स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक तयार केले जाते. व आता 2023 च्या बझेट मध्ये 45 करोड रुपये त्याच्या लाइटींगसाठी तरतूद केली आहे. आणि आम्हचे बुद्धिजीवी म्हणणारे लोक 52 दिवसांपासून आंदोलनच करत आहेत. समाजाकडून पैसे गोळा करणे, नास्ता, जेवण करणे, गाणी म्हणणे, फोकनाळ भाषणे देणे आणि समाजाला मूर्ख बनविणे सुरू आहे. महाराष्ट्र शासन हा पक्षपात व भेदभाव कसे काय करु शकते ? याचा जाब सरकारला मागच्याही अधिवेशनात विचारला नाही, व याही अधिवेशनात विचारला नाही आणि आमचे नेते व पक्षाचे कार्यकर्ते याच प्रकरणात उच्च न्यायालयात पी आय एल PIL न दाखल करता 51 दिवसापासून आरोपी असलेल्या विभागीय आयुक्त नागपूर, यांना निवेदन देत आहेत आणि दुसरीकडे तेच विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी नागपूर, उप आयुक्त महानगरपालिका नागपूर, उपविभागीय अधिकारी नागपूर, तहसीलदार नागपूर, मंडळ अधिकारी नागपूर या सर्वांनी खाजगी वकील करून याच प्रकरणात वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयात हजेरी लावली आहे. ही कमाल एक दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी एका दिवसात करून दाखवली आहे. समाज काय करत आहे या सर्व आरोपींनी अनुच्छेद 15 चे उल्लंघन केले आहे काय वरोरा माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाचा दणका…….नागपूर – अंबाझरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाडल्या जाते तर त्याच जागेत दुसऱ्या बाजूला स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक बांधले जाते, हा पक्षपात भेदभाव शासनाने केल्याप्रकरणी, तलाठी विनोदभाऊ खोब्रागडे यांनी फौजदारी प्रकरण क्रमांक 3/2023 दाखल केले होते.पर्यटन मंत्री सह गरुड कंपनी, सचिव मंत्रालय मुंबई व तलाठी यांचा अटक वारंट काढण्यासाठी फिर्यादी विनोदभाऊ खोब्रागडे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले. आरोपी विभागीय आयुक्त नागपूर श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी नागपूर, उप आयुक्त महानगरपालिका नागपूर श्री. अजय गुल्हाने, तत्कालीन जिल्हाधिकारी नागपूर, श्री. रविंद्र ठाकरे, तहसीलदार नागपूर श्री. सुर्यकांत पाटील, मंडळ अधिकारी श्री. आनंद देठे नागपूर हे हजर होऊन खाजगी वकील अँड. उराडे साहेब, व उप आयुक्त महानगरपालिका नागपूर श्री. अजय गुल्हाने कडून अँड. पुरुषोत्तम सातपुते साहेब हजर झाले.
याचिकाकर्ता खुद्द तलाठी विनोद खोब्रागडे स्वत: हजर झाले. सविस्तर असे की……ज्याअर्थी मौजा अंबाझरी नागपूर येथे स. नंबर 1 हा 350
एकर सरकारी नंबर आहे, त्यामध्ये तलाव होते व आहे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 20 एकरात स्मारक होते, तेस्मारक बेकायदेशीरपणें बुलडोझर लावून महसूल अधिकारी यांच्या आशिर्वादाने गरुड कंपनीने पाडले. अंबाझरी तलाव आजही मौक्यावर असतानां सुद्धा 7/12 वर बगीचा दाखवून शासनाची दिशाभूल केली आहे. ज्या दिवशी जमीन महसूल कलम 150 (2) ची नोटीस दिली, त्याच दिवशी फेरफार मंजूर केले, असे महाराष्ट्रात, भारतात कुठेच होत नाही, व तसा कायदाही नाही. अखेर भारतीय संविधानाचे अभ्यासक, जबाबदार व जागृत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आयु. विनोद खोब्रागडे वरोरा यांनी व्यथीत होऊन, विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे एट्रासिटीचा कलमासह फौजदारी पिटीशन स्वतः दाखल केली. व स्वतःच आर्ग्युमेन्ट केले.
माननीय न्यायमूर्ती यांनी आरोपी गरुड कंपनी, मंत्री,विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी नागपूर,-उपविभागीय अधिकारी नागपूर, तहसीलदार नागपूर, मंडळ अधिकारी नागपूर, तलाठी अंबाझरी, व महानगरपालिका उप आयुक्त नागपूर यांना नोटीस इशू केली व 9/3/2023 ला पेशीहोती.अखेर आरोपी यांनी खाजगी वकिल पत्र दाखल करून उतर देण्यास वेळ मागीतला आहे. पुढची पेशी तारीख 13/4/2023 आहे. एक लक्षात घ्या कायद्यापुढे सर्व समान आहेत. आपल्या समाजाचे काही लोक, व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेते, मागील अनेक दिवसांपासून मुर्ख बनवत आहेत. त्यांच्यापासून समाजाने जागृत रहावे. कारण या प्रकरणात सर्वच पक्षांचे लोक सामील आहेत. म्हणून वरील प्रमाणे न्यायालयातून न्याय मिळवावे. किंवा उच्च न्यायालयात जनहित याचिका तात्काळ दाखल करावी, किंवा फौजदारी पिटीशन दाखल करावे.
याचिकाकर्ते- जबाबदार व जागृत नागरिक, संविधानाचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आयु. विनोदभाऊ खोब्रागडे वरोरा मोबाईल नंबर 9850382426.