HomeMost Popularजन्मताच आईचे मातृत्व हरवलेल्या आदेशचे सायकल चालविण्याचे स्वप्न कर्मयोगीने केले पूर्ण...*

जन्मताच आईचे मातृत्व हरवलेल्या आदेशचे सायकल चालविण्याचे स्वप्न कर्मयोगीने केले पूर्ण…*

*जन्मताच आईचे मातृत्व हरवलेल्या आदेशचे सायकल चालविण्याचे स्वप्न कर्मयोगीने केले पूर्ण…*
*आईबडीलांच्या प्रेमाला पोरका झालेला आदेश कर्मयोगीच्या दातृत्वाने सुखावला..*
कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे मोठ्या प्रमाणात आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींसाठी त्यांच्या शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी कर्मयोगीला सावळी बिंबी हिंगणा जि. नागपूर या गावातील कर्मयोगी कडून सायकल मिळालेल्या वैष्णवी लिडबे या मुलीचा फोन आला. ती म्हणाली माझ्या गावामध्ये एक अनाथ मुलगा आहे. जन्मापासून आईवडीलांचे प्रेम काय असते हे त्याने पहिलेच नाही. त्याचे सायकल चालविण्याचे स्वप्न आहे. त्याला तुम्ही सायकल देऊन त्याचे स्वप्न पूर्ण करणार का? लगेचव माहिती घेण्यासाठी त्या गावला कर्मयोगीची टीम पोहोचली व माहिती घेण्यास सुरुवात केली . चि. आदेश नरेश चिचघरे हा अवघा ४ दिवसाचा असतांना त्याची आई स्व. विद्या चिचघरे यांची दवाखान्यामध्येच बाळातपणातच प्राणज्योत मावळली, त्यानंतर चि. आदेश चा सांभाळ तब्ब्ल ११ महिन्यापर्यंत त्याची मोठी आई सौं.ललिता राजेंद्र झाडे रा. येळाकेळी यांनी केला. या काळात वडील दुसर लग्न करून मोकळे झाले. वडील वागवायला तर सोडा परंतु त्या निरागस मुलांसोबत दोन प्रेमाचे शब्द सुद्धा बोलत नाहीत. त्यामुळे आजपर्यंत संपूर्ण सांभाळ आजीने केला पण आजीला आता डोळ्याने दिसत नसल्यामुळे चि. आदेश आणि त्याची आजी यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली.आता माझ्या नातवाचे काय होईल? कोण सांभाळ करेल? असा प्रश्न आजीसमोर उभा राहिला.आजीने स्वतःच्या मुलीकडे जाण्याचा निश्चय केला आणि नातवाला घेऊन बिबी या गावी आली. स्वतःच्या मुलीकडे आल्यानंतर त्यांचा संसार पण हातावर आणून पानावर खाणे असा आहे हे कळले. तरीपण चि. आदेश याचे मामाजी श्री.शांताराम लिडबे व आत्या सुनिता लिडबे यांनी त्याचा पालनपोषण करण्याची जिम्मेदारी घेतली, चि. आदेश हा श्रीकृष्ण हायस्कूल, कान्होलीबारा (जवळपास अंतर ७किमी ) येथे शिक्षणासाठी कोणाच्यापन गाडीला लिफ्ट मागून जात असे कधी गाडी न मिळाल्यामुळे घरीच राहायचा आणि रडायचा. शिकण्याची खूप जिद्द पण परिस्थिती नव्हती की कोणी सायकल सुद्धा घेऊन देणार. ही संपूर्ण माहिती एकताचं कर्मयोगीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मुखातून निघाले,आपण आदेशला मदत करू. तो अनाथ नाही आहे, कर्मयोगी फाऊंडेशन त्याच्या सोबत आहे. आपण त्याला घरी जाऊन शाळेत जाण्याकरिता सायकल देऊन त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू व शिक्षणातील उत्साह वाढवू. दिनांक २३/०६/२२ला बिबी या गावी कर्मयोगी मंडळी बिबी या गावी जाऊन चि. आदेश नरेश चिचघरे या अनाथ मुलाला मायेची सावली म्हणून सायकल स्वरूपी भेट देऊन त्याचे स्वतःची सायकल असण्याचे स्वप्न पूर्ण केले यावेळी आदेश व त्याच्या आजीच्या चेहत्यावरील आनंद पाहण्याजोकता होता

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular