*जागतिक सायकल दिनी कर्मयोगीने दिली गोरगरिब विद्यार्थ्यांच्या जीवनाला गती..*
★ शिस्ततेचं आदर्श प्रतीक म्हणजे कर्मयोगी फाऊंडेशन.. डॉ. प्रशांत कडू.
★जागतिक सायकल दिनाला ३० सायकलचे वाटप…
कर्मयोगी फाऊंडेशनन तर्फे १५१ सायकल वाटपाचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाचे सहा टप्प्यात नियोजन करण्यात आले आहे. त्यांपैकी या संकल्पाचा पाचवा टप्पा शरीर निरोगी राहण्यासाठी तसेच पर्यावरणाचे जतन करण्यासाठी सायकल चालविणे अतिशय लाभदायक आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेत जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधत दि.३ जून शुक्रवारला केईसी ट्रेनिंग सेंटर बुटीबोरी येथे विधवा महिलांना प्रेमरूपी आधार देऊन विशेषतः कोरोना काळात आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत २५ सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच जागतिक सायकल दिन विशेष म्हणुन वडील नसलेल्या गरजवंत ५ मुलांना सायकल देत एकूण ३० सायकल देऊन सायकल वाटपाचा पाचवा टप्पा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आभा गायकवाड पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मोहगावचे प्राचार्य डॉ. प्रशांत कडू उदघाटक लेमकेन इंडिया बुटीबीरीचे मानव संसाधन व्यवस्थापक श्रीपाद टाकळकर, प्रमुख उपस्थितीत परिवहन प्रादेशिक अधिकारी नागपूर शहरचे रवींद्र भुयार, संघर्ष वाहिनी नागपूरचे संघटक दीनानाथ वाघमारे ही मंडळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रशांत कडू म्हणाले की स्वयंऊर्जेतून एखादं कार्य करतांना त्याच्या कर्तृत्वातून, वागण्यातून, बोलण्यातून जे कार्य दृष्टीक्षेपात येतं ते खरं कार्य असतं , तेच कार्य कर्मयोगी करत आहे. गाडगेबाबा व तुकड्यादास याचं कार्य पुढे नेण्याचं कार्य कर्मयोगी शिस्तबद्ध पध्दतीने करत आहे. ते म्हणाले महात्मा गांधींनी जे काही कार्य केलं ते शिस्तीच्या भरवशावर केलं, आणि तेच काम कर्मयोगी करत आहे. त्यामुळे कर्मयोगी फाऊंडेशन हे खऱ्या अर्थाने शिस्तीचं प्रतीक आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला गणमान्य मंडळी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या निराधार महिलांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की आजच्या कार्यक्रमात आम्हाला जो मानसन्मान मिळाला तो आम्हाला कधीच मिळाला नाही. आमची चहा पासून ते जेवणा पर्यंत उत्तम व्यवस्था करण्यात आली, व खऱ्या अर्थांने कर्मयोगीने सायकल देऊन आमच्या मुलांच्या शिक्षणाला गती देऊन त्यांच्यासाठी प्रगतीचे दरवाजे उघडे करून दिले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली…