- प्रियसीवर बलात्कार करून जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप व 1,00,000/- रू. दंडाची शिक्षा गडचिरोली येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश,
श्री. यु. एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्णय
JBT आवाज TV NEWS कबिर धर्माजी निकुरे गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ
वृत्त असे कि, दिनांक ०२/०२/२०१८ रोजी पोलीस स्टेशन कुरखेडा येथील सहा. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा किसन सहारे हे नेहमी प्रमाणे आपले कर्तव्यावर असतांना त्यांना माहिती मिळाली की, मौजा डिप्राटोला ते तळेगाव जाणाऱ्या कच्चा रोडचे बाजुला एका महिलेचा मृत्यदेह मिळुन आल्याची माहिती मिळाल्याने ते तेथे जावून चौकशी केली असता सदर महिला ही अंदाजे वय 18 ते 20 वर्ष वयोगटातील असुन तिचा रंग गोरा काळे केस, अंगामध्ये काळया रंगाचे फुल जॅकेट, त्याचे आतमध्ये एक लाल रंगाचे टॉप, काळया रंगाचे फुल जिन्स पँट, पायामध्ये सँडल अशा वर्णनाची तिचा गळा हत्याराने अर्धवट चिरलेला अशा वर्णनाची अनोळखी महिला मिळाल्याने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर महिले जवळ ट्रॅव्हल्सचे तिकीट मिळाले त्या तिकीटावर बुकिंग करतेवेळी मोबाईल क्रंमाक टाकण्यात आला होता त्या मोबाईलचा एसडिआर काढले असता तो मोबाईल क्रमांक आरोपीच्या मित्राचा होता त्याच्या मित्राला विचारपुस केली असता तो मोबाईल क्रमांक हा माझाच असुन तो मि माझा मित्र आरोपी प्रदीप बालसींग हारामी याला दिले होते असे त्याने सांगीतले त्या वरून आरोपीला ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा मिच केला आहे हे कबुल केले. पिडीता ही आरोपीची प्रियसी होती व त्यांचे एकमेकावर प्रेम होते.
यातील मयत हि पुणे येथे नौकरी करीत होती. ती आपले गावाजवळील कोटगुल येथील नियोजीत मंडई करीता पुणे येथुन आपले गावाकडे येत असतांना आरोपी याने दिनांक 31/01/2018 रोजी सुमारे 05.30 वा. दरम्यान देसाईगंज येथुन सोबत आणुन डिप्राटोला व तळेगाव जाणाऱ्या कच्या रोडच्या बाजुला घेवुन गेला. त्या ठिकाणी मयता सोबत शाररीक संबंध करून मयत ही त्यास आपण लवकरात लवकर लग्न करू असा हट्ट करू लागली परंतु आरोपी हा यापुर्वीच त्याचे कॉलेच मधील मैत्रीनीशी प्रेमसंबंध असल्याने व मृतक ही तगादा लावत असल्याने आता काय करावे या विवंचनेतून आरोपीने मनात राग धरून तिचा गळा दाबला व ती मृत झाली किंवा नाही म्हणुन तिचा पुन्हा ब्लेडने गळयावर वार करून जिवानीशी ठार केले. आरोपीला दिनांक 03/02/2018 रोजी अटक करण्यात आली. सरद प्रकरणात पोस्टे कुरखेडा अप.क्र. 13/2018 कलम 302, 376 (1) भादवी अन्वये गुन्हा नोदं करण्यात
आला.
पोलीस यंत्रणेने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून तसेच प्रकरणातील परीस्थितीजन्य पुरावे लक्षात घेवुन आज दिनांक 04/02/2023 रोजी आरोपी नामे प्रदीप बालसींग हारामी रा. ढोलडोंगरी ह. मु. अंतरगाव ता. कोरची याला मा. अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. यु. एम. मुधोळकर गडचिरोली यांनी कलम 302 भादवी मध्ये जन्मठेप व 1,00,000/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. व कलम ३७६(१) अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास सपोनी / गजानन पडळकर, पोस्टे कुरखेडा यांनी केला आहे. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.