HomeMost Popularविदर्भ अध्यक्ष राजुभाऊ देशमुख(बापू)यांनी देवराव गोविंदाजी दुधबळे यांची गडचिरोली जिल्हा प्रमुख म्हणून...

विदर्भ अध्यक्ष राजुभाऊ देशमुख(बापू)यांनी देवराव गोविंदाजी दुधबळे यांची गडचिरोली जिल्हा प्रमुख म्हणून निवड केली*

*विदर्भ अध्यक्ष राजुभाऊ देशमुख(बापू)यांनी देवराव गोविंदाजी दुधबळे यांची गडचिरोली जिल्हा प्रमुख म्हणून निवड केली*
■ शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने वाहतूकदारांच्या व कामगारांच्या न्याय हक्कासाठी , संघटनेची ध्येय धोरणे आणि वाहतूकदारांचा व कामगारांचा हित लक्षात घेता शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक संघटना व भारतीय जनरल कामगार सेना गडचिरोली जिल्हा प्रमुख म्हणून देवराव गोविंदाजी दुधबळे यांची नियुक्ती करण्यात आली . याप्रसंगी विदर्भ अध्यक्ष राजुभाऊ देशमुख (बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ संपर्क प्रमुख कबिर धर्माजी निकुरे यांनी नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व याप्रसंगी विदर्भ महासचिव विकास रामटेके , शेखर निकुरे, कुडंलिक राठोड , कुदन शेरे , दीपक कर्मानी ,राजेश चव्हाण , गणेश रूडे व अन्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते . देवराव दुधबळे हे या आधी गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा संघटक म्हणून काम केले आहे व त्यांची कामाची प्रसंशा व स्पीड पाहूनच हा निर्णय वरीष्ठ पदाधिकारी यांनी घेऊन यांच्याकडे पूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष निवळीची जबाबदारी दिली आहे व यांनी सुद्धा ती स्वीकारले व लवकरच गडचिरोली जिल्हा शिवसेनामय होईल असे आश्वासन दिले. शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक संघटना व भारतीय जनरल कामगार सेना देवराव दुधबळे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे गडचिरोली जिल्ह्यातील जनतेने सुद्धा अभिनंदन व कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular