गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस काम आणि काम न करता पैशाची उचल केल्या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ६ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.त्या समितीच्या अहवाल नुसार भामरागड, अहेरी,मुलचेरा या तीन तालुक्यामधील अधिकारी / कर्मचारी दोषी आढळले आहेत. दोषी ठरवलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी केली आहे. अन्यथा दिनांक २७/०३/२०२३ पासून जिल्हा परिषद गडचिरोली समोर बेमुद्दत उपोषण आणि धरणे आंदोलन चालू आहे. तरी जिल्हापरषदेच्या अधिकाऱ्यावर कोणताही फरक पडला नाही.
२७/०३/२०२३ पासून जिल्हा परिषद गडचिरोली समोर बेमुद्दत उपोषण आणि धरणे आंदोलन. JBT आवाज news channel कबिर धर्माजी निकुरे गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ
RELATED ARTICLES