HomeMost Popularकुंभार समाजाचा इतिहास आणि सद्यस्थिती? काय आहे कुंभार समाजाचा इतिहास,

कुंभार समाजाचा इतिहास आणि सद्यस्थिती? काय आहे कुंभार समाजाचा इतिहास,

कुंभार समाजाचा इतिहास आणि सद्यस्थिती?
काय आहे कुंभार समाजाचा इतिहास,

कुंभार समाजातील जाती किती?

औद्योगिक क्रांतीनंतर कुंभार समाजाच्या व्यवसायावर काय परिणाम झाला?

कुंभार समाजाचा इतिहास आणि सद्यस्थिती?
काय आहे कुंभार समाजाचा इतिहास, कुंभार समाजातील जाती किती? औद्योगिक क्रांतीनंतर कुंभार समाजाच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? कुंभार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती नक्की काय आहे वाचा प्रा.डॉ. सचिन भास्कर कुंभार यांचं विशेष विश्लेषण भारतात विविध वंश, धर्म आणि संस्कृतीचे लोक राहतात तसेच त्यांची भाषा व बोली भाषा या देखील आपल्याला विविधता आढळून येते. त्यामुळे भारतीय समाजामध्ये विविधता आहे. हा समाज विविध जातींमध्ये विभाजित झालेला असला तरी अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व एकोप्याने राहतात. सामाजिक तणाव निर्माण होऊ न देण्याचा प्रयत्न करतात. भारतात एकूण 655 जाती आहेत, यातील महाराष्ट्रात 285 जाती आहेत. प्रत्येक धर्मामध्ये अनेक जातींचा समावेश आहे. त्या जातींमध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या काही प्रगत जाती आहे तर काही अप्रगत अवस्थेतील जाती आहेत.
ज्या प्रगत जाती आहेत. त्यांना भारतीय राज्यघटनेने शासनाच्या सवलती नाकारलेल्या आहेत आणि अप्रगत असणाऱ्या जातीस शासनाने अनेक निर्णयांतर्गत सवलती दिल्या आहेत. या सवलतीमध्ये शैक्षणिक सवलती, नोकरीविषयक सवलती, औद्योगिक विषयक धोरणात सवलती, निवडणूक विषयक सवलती अशा अनेक क्षेत्रात सवलती देऊन अप्रगत जातीतील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न शासनामार्फत देऊ केलेले आहे.

अनादिकाळापासून वैदिक समाजरचनेत जाती व्यवस्थेची निर्मिती झालेली आहे. प्रत्येक जातीचा व्यवसाय ठरविण्यात आलेला होता, त्या वेळच्या प्रचलित रूढीप्रमाणे व्यवसायावरून जात ठरविण्यात आली. चातुवर्ण व्यवस्था निर्माण झाली. तेव्हा तत्त्वज्ञान सांगणारे व पूजा पाठ करणारे ब्राम्हण ही एक वर्णव्यवस्था, आक्रमकता ठेवून इतरांचे रक्षण करणारे क्षेत्रीय ही दुसरी वर्णव्यवस्था, व्यापार करणारे वैश्य तिसरी वर्णव्यवस्था, या तीनही वर्णव्यवस्थांची कनिष्ठ प्रकारची कामे करणारी चौथी वर्णव्यवस्था म्हणजे शूद्र वर्णव्यवस्था होय.जास्तीत जास्त अप्रगत जाती शूद्र वर्ण व्यवस्थेतील आहे. ग्रामीण व शहरी भागातील बारा बलुतेदारांच्या जातीचा एक गट चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या शूद्र वर्णव्यवस्थेत आहे. त्यामध्ये सुतार, लोहार, धोबी, न्हावी, माळी, जंगम, महार, सोनार, कुंभार, कोळी, गुरव आणि तेली इत्यादी जातींचा समावेश यात आहे.
जंगमाने धार्मिक विधी क्रिया करावी, कुंभाराने मातीच्या वस्तू तयार कराव्यात, सोनाराने दागिने तयार करावे, लोहाराने लोखंडाच्या वस्तू तयार कराव्यात, सुताराने लाकडी काम करावे, धोब्याने कपडे धुण्याचे काम करावे, न्हाव्याने केस कापण्याचं काम करावे. या कामाबद्दल बलुतेदारांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ज्वारी, गहू, तांदूळ, तेल, मीठ, दाळी,मिरची या जीवनावश्यक वस्तू वरील तीनही वर्णव्यवस्थेचे लोक देत असत, म्हणजे प्रत्येक जातीचे उदरनिर्वाहाचे साधन त्यांचा व्यवसाय हा बनलेला होता,औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण, आधुनिक जीवन पद्धती, निरक्षरता आणि या साऱ्याची सुरुवात करणारी औद्योगिक क्रांती यामुळे अनेक जाती अक्षरशः उध्वस्त झाल्या होत्या. त्या आपत्तीतून सावरण्यासाठी अनेक पिढ्या खर्ची पडल्या. रेल्वे आल्याने बैलांवरून वाहतूक करणारे बंजारा देशोधडीला लागले, कापड गिरण्या मुळे कोष्टी-साळ्यांची अवस्था अंगठे तोडल्यासारखी झाली, रॉकेलवर चालणारे दिवे आल्याने तेलाचा व्यवसाय निम्म्यावर आला. या जातीबरोबरच कुंभार समाजावर देखील याचा परिणाम झाला. जी मातीची भांडी होती. त्यांची जागा स्टील व प्लास्टिक ने घेतली असे चित्र आपल्या समोर दिसून येते

शेतकऱ्यांच्या प्रापंचिक उपयोगाचा अत्यंत महत्त्वाचा बलुतेदार म्हणजे कुंभार होय. कुंभार शब्द संस्कृत ‘कुंभ-कार’ या शब्दावरून आला असेही काही जण मानतात, कुंभार राहतात त्या भागाला कुंभारवाडा असं म्हटलं जातं. कुंभार माती व सरपन यांची वाहतूक करणे. या कामाशिवाय विटा, कौल, रांजण, माठ इत्यादी तयार करून धान्याच्या मोबदल्यात किंवा रोख स्वरुपात विकणे असा त्यांचा व्यवसाय असतो.

महाराष्ट्रात कुंभार समाजाच्या पोट जाती या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. थोर संशोधक आर. के. गुलाटी यांनी महाराष्ट्रात कुंभाराच्या पोटजाती सांगितलेल्या आहेत (इरावती कर्वे हिंदू समाज अन्वयार्थ पृ 119)

१) मराठा कुंभार- या देशात सर्वत्र आढळतो. या जातीच्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ते मराठी बोलतात. कोल्हापुरात यांची मोठी वस्ती आहे. त्यांचा पोषाख कुणब्या सारखा असतो. ते मडके, विटा, कौले, खेळणी व मुर्त्या तयार करतात, पुरुष चाक वापरतात तर स्त्रिया हाताने भांडी घडवतात.

२) गुजराती कुंभार- महाराष्ट्र व गुजरात यांच्या समुद्रकिनारी भागात राहतात व त्यांनाच लाड किंवा प्रजापती अशी नावे आहे तसेच घरघडे व ओझा अशी ही नावे आहेत. घरघडे म्हणजे मडकी घडविणारे ओझा (संस्कृत उपाध्याय) म्हणजे धर्मगुरू हे कुंभार यांचे पुरोहित म्हणून काम पाहतात.

३) कोकणी कुंभार- रत्नागिरी, कारवार अशा जिल्ह्यामध्ये सर्वत्र आढळतात

४) राणा कुंभार- नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात यांची वस्ती आहे

५) अहीर कुंभार- यांना लहान चाके असेही म्हणतात. ते खानदेशातील धुळे जिल्ह्यात यांचा वास्तव्य असून ते थोर चाक कुंभार पासून वेगळे झालेअशी त्यांची समजूत आहे

६) लाड कुंभार- यांना थोर चाके म्हणतात, त्यांच्या चाकाचा व्यास सुमारे चार फूट किंवा अधिक असतो. ते जळगाव जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

७) परदेशी कुंभार- महाराष्ट्रात हिंदी बोलणाऱ्या व बाहेरून वस्ती करून राहणाऱ्यांना परदेशी कुंभार म्हणतात.

८) तेलंगी कुंभार- हे मराठवाडा व चांदा जिल्ह्यात राहतात.

९) लिंगायत कुंभार- कर्नाटक राज्य आणि सोलापूर, कोल्हापूर व मराठवाडा येथे त्यांची वस्ती आहे. लिंगायत असल्यामुळे ते गळ्यामध्ये लिंग अडकवतात.

१०) कुरेरे कुंभार- विदर्भ रत्नागिरीचा काही भाग या भागात राहणारे कुंभार माती कुटण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी दगडी पाट्याचा वापर करतात त्यांची संख्या महाराष्ट्रात अत्यल्प आहे.

११). हातघडे कुंभार- सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग, सोलापूर जिल्ह्याचा उत्तरेकडील भागात आढळतात. घागरी, कुंड्या, रांजण इत्यादी वस्तू ते हाताने तयार करतात म्हणून त्यांना हातघडे कुंभार असे म्हणतात

१२). गधेरिया कुंभार- कुंभार कामासाठी स्वतःची गाढवे पाळणारा कुंभार हा चंद्रपूर, नागपूर, बीड इत्यादी जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात आढळतो यांची संख्या अत्यल्प आढळते.

अशा बारा प्रकारात कुंभार समाजाची पोटजाती आढळून येतात, महाराष्ट्रात कुंभार समाजाच्या ज्या विविध संघटना आहेत. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून २०१२ पर्यंत ८० लाख लोकसंख्या ही पाहणीतून समोर आली आहे.

(शासन दफ्तरी कुंभार समाजाच्या लोकसंख्ये सबंधी कोणतीही नोंद नाही) या समाजात साक्षरतेचे प्रमाणEnvironmentमॅक्स रिपोर्टमॅक्स ब्लॉग्जFact CheckNews Updateमॅक्स व्हिडीओमॅक्स किसानMax हिंदीMax Woman
Home > मॅक्स रिपोर्ट > कुंभार समाजाचा इतिहास आणि …
कुंभार समाजाचा इतिहास आणि सद्यस्थिती?
काय आहे कुंभार समाजाचा इतिहास, कुंभार समाजातील जाती किती? औद्योगिक क्रांतीनंतर कुंभार समाजाच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? कुंभार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती नक्की काय आहे वाचा प्रा.डॉ. सचिन भास्कर कुंभार यांचं विशेष विश्लेषण
By – प्रा.डॉ. सचिन कुंभारUpdate: 2021-05-25 10:04 GMT
कुंभार समाजाचा इतिहास आणि सद्यस्थिती?
भारतात विविध वंश, धर्म आणि संस्कृतीचे लोक राहतात तसेच त्यांची भाषा व बोली भाषा या देखील आपल्याला विविधता आढळून येते. त्यामुळे भारतीय समाजामध्ये विविधता आहे. हा समाज विविध जातींमध्ये विभाजित झालेला असला तरी अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व एकोप्याने राहतात. सामाजिक तणाव निर्माण होऊ न देण्याचा प्रयत्न करतात. भारतात एकूण 655 जाती आहेत, यातील महाराष्ट्रात 285 जाती आहेत. प्रत्येक धर्मामध्ये अनेक जातींचा समावेश आहे. त्या जातींमध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या काही प्रगत जाती आहे तर काही अप्रगत अवस्थेतील जाती आहेत.

ज्या प्रगत जाती आहेत. त्यांना भारतीय राज्यघटनेने शासनाच्या सवलती नाकारलेल्या आहेत आणि अप्रगत असणाऱ्या जातीस शासनाने अनेक निर्णयांतर्गत सवलती दिल्या आहेत. या सवलतीमध्ये शैक्षणिक सवलती, नोकरीविषयक सवलती, औद्योगिक विषयक धोरणात सवलती, निवडणूक विषयक सवलती अशा अनेक क्षेत्रात सवलती देऊन अप्रगत जातीतील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न शासनामार्फत देऊ केलेले आहे.

अनादिकाळापासून वैदिक समाजरचनेत जाती व्यवस्थेची निर्मिती झालेली आहे. प्रत्येक जातीचा व्यवसाय ठरविण्यात आलेला होता, त्या वेळच्या प्रचलित रूढीप्रमाणे व्यवसायावरून जात ठरविण्यात आली. चातुवर्ण व्यवस्था निर्माण झाली. तेव्हा तत्त्वज्ञान सांगणारे व पूजा पाठ करणारे ब्राम्हण ही एक वर्णव्यवस्था, आक्रमकता ठेवून इतरांचे रक्षण करणारे क्षेत्रीय ही दुसरी वर्णव्यवस्था, व्यापार करणारे वैश्य तिसरी वर्णव्यवस्था, या तीनही वर्णव्यवस्थांची कनिष्ठ प्रकारची कामे करणारी चौथी वर्णव्यवस्था म्हणजे शूद्र वर्णव्यवस्था होय.

जास्तीत जास्त अप्रगत जाती शूद्र वर्ण व्यवस्थेतील आहे. ग्रामीण व शहरी भागातील बारा बलुतेदारांच्या जातीचा एक गट चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या शूद्र वर्णव्यवस्थेत आहे. त्यामध्ये सुतार, लोहार, धोबी, न्हावी, माळी, जंगम, महार, सोनार, कुंभार, कोळी, गुरव आणि तेली इत्यादी जातींचा समावेश यात आहे.
जंगमाने धार्मिक विधी क्रिया करावी, कुंभाराने मातीच्या वस्तू तयार कराव्यात, सोनाराने दागिने तयार करावे, लोहाराने लोखंडाच्या वस्तू तयार कराव्यात, सुताराने लाकडी काम करावे, धोब्याने कपडे धुण्याचे काम करावे, न्हाव्याने केस कापण्याचं काम करावे. या कामाबद्दल बलुतेदारांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ज्वारी, गहू, तांदूळ, तेल, मीठ, दाळी,मिरची या जीवनावश्यक वस्तू वरील तीनही वर्णव्यवस्थेचे लोक देत असत, म्हणजे प्रत्येक जातीचे उदरनिर्वाहाचे साधन त्यांचा व्यवसाय हा बनलेला होता,

औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण, आधुनिक जीवन पद्धती, निरक्षरता आणि या साऱ्याची सुरुवात करणारी औद्योगिक क्रांती यामुळे अनेक जाती अक्षरशः उध्वस्त झाल्या होत्या. त्या आपत्तीतून सावरण्यासाठी अनेक पिढ्या खर्ची पडल्या. रेल्वे आल्याने बैलांवरून वाहतूक करणारे बंजारा देशोधडीला लागले, कापड गिरण्या मुळे कोष्टी-साळ्यांची अवस्था अंगठे तोडल्यासारखी झाली, रॉकेलवर चालणारे दिवे आल्याने तेलाचा व्यवसाय निम्म्यावर आला. या जातीबरोबरच कुंभार समाजावर देखील याचा परिणाम झाला. जी मातीची भांडी होती. त्यांची जागा स्टील व प्लास्टिक ने घेतली असे चित्र आपल्या समोर दिसून येते

शेतकऱ्यांच्या प्रापंचिक उपयोगाचा अत्यंत महत्त्वाचा बलुतेदार म्हणजे कुंभार होय. कुंभार शब्द संस्कृत ‘कुंभ-कार’ या शब्दावरून आला असेही काही जण मानतात, कुंभार राहतात त्या भागाला कुंभारवाडा असं म्हटलं जातं. कुंभार माती व सरपन यांची वाहतूक करणे. या कामाशिवाय विटा, कौल, रांजण, माठ इत्यादी तयार करून धान्याच्या मोबदल्यात किंवा रोख स्वरुपात विकणे असा त्यांचा व्यवसाय असतो.

महाराष्ट्रात कुंभार समाजाच्या पोट जाती या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. थोर संशोधक आर. के. गुलाटी यांनी महाराष्ट्रात कुंभाराच्या पोटजाती सांगितलेल्या आहेत (इरावती कर्वे हिंदू समाज अन्वयार्थ पृ 119)

१) मराठा कुंभार- या देशात सर्वत्र आढळतो. या जातीच्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ते मराठी बोलतात. कोल्हापुरात यांची मोठी वस्ती आहे. त्यांचा पोषाख कुणब्या सारखा असतो. ते मडके, विटा, कौले, खेळणी व मुर्त्या तयार करतात, पुरुष चाक वापरतात तर स्त्रिया हाताने भांडी घडवतात.

२) गुजराती कुंभार- महाराष्ट्र व गुजरात यांच्या समुद्रकिनारी भागात राहतात व त्यांनाच लाड किंवा प्रजापती अशी नावे आहे तसेच घरघडे व ओझा अशी ही नावे आहेत. घरघडे म्हणजे मडकी घडविणारे ओझा (संस्कृत उपाध्याय) म्हणजे धर्मगुरू हे कुंभार यांचे पुरोहित म्हणून काम पाहतात.

३) कोकणी कुंभार- रत्नागिरी, कारवार अशा जिल्ह्यामध्ये सर्वत्र आढळतात

४) राणा कुंभार- नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात यांची वस्ती आहे

५) अहीर कुंभार- यांना लहान चाके असेही म्हणतात. ते खानदेशातील धुळे जिल्ह्यात यांचा वास्तव्य असून ते थोर चाक कुंभार पासून वेगळे झालेअशी त्यांची समजूत आहे

६) लाड कुंभार- यांना थोर चाके म्हणतात, त्यांच्या चाकाचा व्यास सुमारे चार फूट किंवा अधिक असतो. ते जळगाव जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

७) परदेशी कुंभार- महाराष्ट्रात हिंदी बोलणाऱ्या व बाहेरून वस्ती करून राहणाऱ्यांना परदेशी कुंभार म्हणतात.

८) तेलंगी कुंभार- हे मराठवाडा व चांदा जिल्ह्यात राहतात.

९) लिंगायत कुंभार- कर्नाटक राज्य आणि सोलापूर, कोल्हापूर व मराठवाडा येथे त्यांची वस्ती आहे. लिंगायत असल्यामुळे ते गळ्यामध्ये लिंग अडकवतात.

१०) कुरेरे कुंभार- विदर्भ रत्नागिरीचा काही भाग या भागात राहणारे कुंभार माती कुटण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी दगडी पाट्याचा वापर करतात त्यांची संख्या महाराष्ट्रात अत्यल्प आहे.

११). हातघडे कुंभार- सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग, सोलापूर जिल्ह्याचा उत्तरेकडील भागात आढळतात. घागरी, कुंड्या, रांजण इत्यादी वस्तू ते हाताने तयार करतात म्हणून त्यांना हातघडे कुंभार असे म्हणतात

१२). गधेरिया कुंभार- कुंभार कामासाठी स्वतःची गाढवे पाळणारा कुंभार हा चंद्रपूर, नागपूर, बीड इत्यादी जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात आढळतो यांची संख्या अत्यल्प आढळते.

अशा बारा प्रकारात कुंभार समाजाची पोटजाती आढळून येतात, महाराष्ट्रात कुंभार समाजाच्या ज्या विविध संघटना आहेत. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून २०१२ पर्यंत ८० लाख लोकसंख्या ही पाहणीतून समोर आली आहे.

(शासन दफ्तरी कुंभार समाजाच्या लोकसंख्ये सबंधी कोणतीही नोंद नाही) या समाजात साक्षरतेचे प्रमाण कमी व असंघटित असल्याने अनेक सामाजिक व आर्थिक समस्यांना संघर्ष करताना आजही आपल्याला दिसून येतो.

त्यामुळे या समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उन्नतीला मुकलेल्या आहेत, दारिद्र यामध्ये व अशिक्षित जीवन जगत आहे. याचे कारण म्हणजे गाडग्या-मडक्यांचा वापर हळूहळू कमी होत गेला, रांजनाचा वापर अन्नधान्य साठविण्यासाठी होत असे, परंतु याचाही वापर कमी झाला, सिमेंटच्या शेगड्या घरगुती गॅस आणि रॉकेल वर चालणारे स्टोव्ह मातीच्या चूलीला स्पर्धा करू लागले

निमशहरी व तालुक्याच्या गावांमध्ये गॅस एजन्सी सुरू झाल्यावर मातीच्या चुली कमी होत जाण्याचा वेग आणखी वाढला, प्लास्टिकच्या भांड्यांनी मडकी अधिक निरर्थक ठरवली. पारंपारिक व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांचे मोठे प्रमाण शिक्षणविषयक जागृतीचा अभाव यामुळे या बदलत्या आधुनिक समाज जीवनाचा धक्का हा कुंभार समाजाने कसा सोसला? खरे तर कसा पचवत असेल?,

गॅझेटिअर्सच्या जुन्या आवृत्त्या आपण पाहिल्या तर विसाव्या शतकाच्या प्रारंभी नेमकी काय परिस्थिती होती? याचा आपल्याला अंदाज करता येतो. तो म्हणजे विदर्भाच्या गॅझेटमध्ये कुंभारांचा उल्लेखच आपल्याला आढळत नाही. याचा अर्थ तेथील कुंभाराची परिस्थिती फारच दयनीय असली पाहिजे, मराठवाड्यात फक्त औरंगाबादचे गॅझेटिअर्स आहे. त्यात कुंभारांचा आर्थिक परिस्थितीचा असा उल्लेख नसून मूर्तिकार म्हणून वर्णन केलेलं आपल्याला आढळते. याचा अर्थ त्याची परिस्थिती ही काही प्रमाणात बरी असावी असे कळते.

पश्चिम महाराष्ट्रात मात्र, प्रत्येक जिल्ह्यात कुंभार गरीब आहे. त्यांची घरे गवताच्या छपराची आणि मातीची असतात असे वर्णन केलेलं आपल्याला सापडते. तर नाशिक विभागातील काही जिल्ह्यांच्या गॅझेटिअर्स मध्ये कुंभार समाजाच्या पोट जातीचा उल्लेख केलेला आढळतो. तसेच मराठी विश्वकोश मध्ये कुंभार व्यवसायाचा मृत्तिका उद्योग यात उल्लेख केलेला आहे.

यात मातीची भांडी तयार करण्याबद्दल सखोल माहिती दिलेली आढळते. भाजलेल्या विटांची घरे नसणे इतरांसाठी कवले करणाऱ्यांची घरे मात्र गवताने साकारली जाणे हे गरिबीचे लक्षण असावे, या गरिबीमुळेच कुंभारांना सामाजिक बदलाचे धक्के पचविता आले असावे हे त्या समाजालाच माहित.सर्व कुंभार समाजाचा व्यवसाय हा उघड्यावर चालत असल्याने पावसाळ्यात काम करणे त्यांना शक्य नसते, मातीची भांडी मडकी करणे, तिला वाळविणे, नंतर भाजणे आणि विटा, कवले करणे. अंतर वाळवणे, भाजणे ही कामे पावसाळा सोडून इतर काळात करावी लागतात. त्यामुळे सहा महिन्यातच वर्षभराची कामे करून मिळवलेल्या संचितावर (उत्पन्न) वर्षभर भागवावे लागत असल्याने काटकसरी, योग्य खर्च करुन कुंभार समाज गरीबी पचवून नव्या बदललेल्या परिस्थितीला सामोरे जात आहे.

यामुळेच हा कुंभार समाज कसं जीवन जगत असवे? सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, पारंपारिक व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी आणि उत्पादित केलेली मातीची भांडी यांना मिळणारा मोबदला तसेच व्यवसायातील मागासलेपणा, शासनाकडून कोणतीही सवलत न मिळणे अशा अनेक समस्या या कुंभार समाजासमोर आजही निर्माण झालेल्या दिसून येतात. तसेच मागील वर्षापासून जो संपूर्ण जगावरती COVID-19 हा संसर्गजन्य आजार पसरलेला आहे. याचाही परिणाम या कुंभार समाजाच्या उदरनिर्वाहवर परिणाम झालेला दिसून येत आहे.

*जन्म भूमि टाइम में जेबीटी आवाज टीवी ब्यूरो मुंबई*

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular