*कर्मयोगीचा गणेशोत्सव ज्येष्ठांच्या चरणी…*
*स्वातंत्र्य संग्राम काळात जन्मलेल्या १४ कर्तृत्ववान ज्येष्ठ मंडळींचा सन्मान..*
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करणारे सेवाभावी संघटन आहे.
आपल्या कल्पकतेतून नवनवीन उपक्रम कर्मयोगी फाऊंडेशन समाजासाठी राबवित असते. यावर्षी सर्विकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यालाच अनुसरून यावर्षीच्या गणेशोत्सवात कर्मयोगी फाऊंडेशनने कर्मयोगीचा गणेशोत्सव
ज्येष्ठांच्या चरणी २०२२ या शिर्षकाखाली १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी स्वातंत्र्य संग्राम काळात जन्म घेऊन स्वातंत्र्या नंतरच्या बिकट परिस्थितीतील देशाची जडणघडण आपल्या डोळ्यांनी बघणाऱ्या, व आपले अमूल्य योगदान आपल्या समाजासाठी, गावासाठी, देशासाठी, देणाऱ्या कर्तृत्ववान ज्येष्ठ लोकांशी प्रेमरूपी संवाद साधत त्यांचे त्या
काळातील सुखदुःखात सहभागी होवून त्यांना या गणेशोत्सवात कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे सन्मानित करण्यात आले.
यासाठी कर्मयोगी फाऊंडेशनने नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ कर्तृत्ववान मंडळींचा शोध घेत गणेशोत्सवात दिनांक ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२२ या कालावधीत ज्येष्ठ मंडळींच्या वयाचा विचार करत १४ ज्येष्ठ मंडळींच्या घरोघरी जावुन त्यांना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, व कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
सन्मानित परिवार पुढीलप्रमाणे नागपूर येथील स्वातंत्र्यसेनानी लीलाताई चितळे, कीर्तीचक्र विजेते प्रभाकर पुराणिक, हिंगणा येथील रामकृष्ण कोल्हे, श्रीराम बिडवाईक वानाडोंगरी येथील रामकृष्ण करणकर, रामकृष्ण तिनकर बुटीबोरी येथिल मधुकर झाडे, नारायण चिकणकर, सुरेश पाठक, पुंडलिक गुरनुले टाकळघाट येथील चंपतराव कावळे, बकाराम राऊत घोडेघाट येथील संतोष सुर्वे व वारंगा येथील तेजराम घायवट या चौदा ज्येष्ठ मंडळींना सन्मानित करण्यात आले.
या ज्येष्ठ मंडळीनी बोलून दाखविले की कर्मयोगी फाऊंडेशनने प्रत्यक्षात आमच्या घरी येऊन आमचा सत्कार करणे हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. आजचे जेवण हे आमच्यासाठी त्यावेळी सणासुदीचे जेवण होते. भाकर, अंबाळीची भाजी, बेसन या शिवाय काही दिसत नव्हतें अनेक दिवस तर तिखटावर पाणी टाकून जेवण केले. प्रवासाची साधने नसल्यामुळे, रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे शिक्षणाची व्यवस्था प्रत्येक गावात पुरेशी नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जात डोळ्यात पाणी येपर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. त्यावेळी पैसा नव्हता परंतु प्रेम, जिव्हाळा, निष्ठा या गोष्टी मोठ्या प्रमाणात जपल्या जात होत्या. आज सतत पैशाच्या मागे धावणाऱ्या या जगात कर्मयोगी फाऊंडेशनने आमचा सन्मान करून निस्वार्थपणे प्रेम देण्याचं काम आम्हाला केलं आहे. त्यामुळे प्रेममय कृतीतून खऱ्या अर्थाने मानव जातीला प्रेम देत गणपती उत्सव व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कर्मयोगीने साजरा केला आहे..
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी यशस्वी मेहनत घेतली..