कर्मयोगीचं आसोला सावंगी येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…
कर्मयोगी फाऊंडेशन हे कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार सरणीनुसार बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर ग्रामीण भागात सतत कार्यरत आहे.
कर्मयोगीने आता ज्या भागात शासकीय किंवा खाजगी अशी कोणतीच आरोग्य सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर राबवून ती देण्यास सुरुवात केली आहे. आसोला सावंगी हे ता. जिल्हा नागपूर मधील गाव परंतु येथे दवाखाना उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेऊन दि. ५ मे २०२३ रोज शुक्रवारला समाज मंदिर सावंगी येथे ११ ते २ या वेळेत निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले.
या शिबिरात डॉ. रंजना वाणे व डॉ. मनीषा रामटेके या तज्ञ मंडळीनी सेवा दिली. श्री पॅथॉलॉजी च्या शुभांगी लंबाडे, रोहित रहांगडाले, कार्तिक मेश्राम यांनी बीपी, शुगर, ब्लड या सर्व तपासण्या करून घेतल्या. या शिबिरात ९० रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिरात औषधी मोठ्या प्रमाणात निशुल्क देण्यात आल्या. शिबिरात येणाऱ्या मंडळींची अल्पहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. विशेष म्हणजे या शिबिराला कमलेश कासुरे हे वैद्यकीय प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते.
या शिबिराच्या आयोजनासाठी आसोला सावंगी गावचे सरपंच शेषरावजी नागमोते व श्री मेडिकल अँड जनरल स्टोव्हर्सचे व्यवस्थापकीय संचालक गजानन राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली…