HomeMost Popularकर्मयोगीचे प्रेमरूपी अभियान अनेकांना देत आहे नवसंजीवनी...

कर्मयोगीचे प्रेमरूपी अभियान अनेकांना देत आहे नवसंजीवनी…

*कर्मयोगीचे प्रेमरूपी अभियान अनेकांना देत आहे नवसंजीवनी…*

■ *४४ गावातील १९ हजार कुटूंबाना भेटी…*

कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर मानव समाजाला भरभरून मदतरूपी प्रेम देण्याचे कार्य करत आहे. त्याच अनुषंगाने कर्मयोगी फाऊंडेशनने प्रत्येकाच्या घरोघरी जाऊया, त्याचे सुखदुःख जाणून घेऊया त्यांना प्रेमरूपी आधार देऊया या शीर्षकाखाली प्रेमरूपी अभियान दिनांक १जून २०२२ पासून सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत कर्मयोगी फाऊंडेशनचे सदस्य तीन ते चार गट पाडून नेमून दिलेल्या गावी जाऊन प्रत्येकाच्या घरी भेट देतात, त्यांच्याशी प्रेमपूर्वक संवाद साधून त्यांचे सुखदुःख जाणून घेत त्यांना मानव जीवनाचे महत्व समजून सांगतात. मानव ही ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे त्यामुळे आपल्याकडून सर्वोत्कृष्ट कार्य झालं पाहिजे याची जाणीव करून देत, जगात खरा एकच धर्म आहे तो म्हणजे एकमेकांना भरभरून प्रेम देणे, आज पिण्याचं पाणी सुद्धा विकत घ्यावं लागत आहे, त्यामुळे आजची मानवाची मानसिकता पाहता भविष्यात त्याला आपल्याच लोकांचं प्रेमसुद्धा विकत घ्यावे लागेल, इतका तो प्रेमासाठी आतुर झाला असेल ही परिस्थिती येऊ नये यासाठी एकमेकांना अडीअडचणीत सहकार्य करत एकमेकांना प्रेमरूपी आधार द्या ही शिकवण या प्रेमरूपी अभियानातून देण्यात येत आहे.

 

आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील नागपूर, हिंगणा तालुक्यातील

बुटीबोरी, सातगाव ,टाकळघाट, रुईखैरी, जंगेश्वर, बोरखेडी रेल्वे, सोनेगाव बोरी , भारकस, सोनुर्ली, किरमीटी, वाठोडा, वारंगा, सुकळी बेलदार , आजनगाव, घोडेघाट, वाकेश्वर, परसोडी, बीड गणेशपूर, किंन्हाळ माकळी, वटेघाट , सालईदाभा, शिरुळ, पोही, मोहगाव बोथली, बोरखेडी फाटक , घोटी, देवळी गुजर, चिमणाझरी, आलागोंदी , टेंभरी, जयपुर पठार, खापरी पठार, कन्हाळगाव पठार, टेभंरी ( भारकस), सोनेगाव लोधी , मोहगाव ( सोनेगाव लोधी), दुधा, तारसी, मांगली, आसोला, भांसोली, धोकर्डा व खापरी सुभेदार या ४४ गावातील १९ हजार घरोघरी जाऊन हे प्रेमरूपी अभियान राबविण्यात आले आहे. अनेकांनी या प्रेमरूपी अभियानातून आमच्या थकल्या भागल्या मनाला, शरीराला, नवसंजीवनी मिळत आहे असे बोलुन दाखविले, आज कोनाकडेच वेळ नसताना कर्मयोगीची मंडळी प्रत्येकाचे सुखदुःख जाणून घेत आहे. अनेकांना त्यातून ते मोठ्या प्रमाणात मदत सुद्धा करत आहेत. आमच्या आयुष्यात आम्ही पाहिल्यादांच बघत आहोत की कोणी इतकं नियोजन पूर्वक अभियान चालवीत आहे, त्यामुळे कर्मयोगी फाऊंडेशनचे जेवढे कौतुक करावे तितके कमी असे अनेकांनी बोलून दाखविले..

या प्रेमरूपी अभियानाबद्दल कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे सांगतात की, लोकांनी मोठ्या प्रमाणात अवास्तव अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत. त्यामूळे आपल्या देशात देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अनेकांची मानसिकता प्रत्येक गोष्टीतून मला काय मिळेल हीच आहे, त्यामुळेच आपण खऱ्या अर्थाने गरीब आहोत. त्यामुळे ही मानसिकता आम्हाला घेण्यापेक्षा देण्यात मोठा आनंद असते व त्यामुळे आपल्या जीवनाचे सार्थक होते यात बदलायची आहे. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ही शिकवण देत डोके ज्ञानामुळे व हात दानामुळे शोभून दिसत असतात. त्यामुळे जोपर्यंत आमच्यात देण्याची मानसिकता तयार होणार नाही तोपर्यंत आम्ही व आमचा देश खऱ्या अर्थाने श्रीमंत होणार नाही. महात्मा गांधी म्हणतात सत्य हेच ईश्वर, ईश्वर हेच सत्य, प्रेम हेच ईश्वर, ईश्वर हेच प्रेम, हीच शिकवण घेत घरोघरी कर्मयोगी फाऊंडेशन प्रेमाचा व मदतीचा दीप लावत आनंदाचे व जिव्हाळ्याचे वाटेकरी होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांकडे गाड्याघोड्या, मोबाइल अले, स्वतःचे घरदार झाले परिस्थित्या सुधारल्या

. तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आले पण माणसं, माणुसकी व प्रेमापासून मोठ्या प्रमाणात दुरावली कोणाकडेच दोन शब्द प्रेमाचे बोलायला सुद्धा वेळ नाही. आजच्या घडीला जे सर्वात दुर्मिळ झालं आहे ते घरोघरी जाऊन प्रेम देत माणुसकी जपण्याचा काम आम्ही करत आहोत.. कर्मयोगीच्या १९ सदस्यांनी या अभियानात भाग घेत हे प्रेमरूपी अभियान ४४ गावात पोहोचविले आहे, २०२३ डिसेंबर पर्यंत आम्ही ते १०० गावात पोहोचवू असा आमचा निर्धार आहे…

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular