कर्मयोगीची १५१ सायकल वाटपाची यशस्वी संकल्पपूर्ती…
★ कोरोना काळात आईवडिलांचे छत्र हरवलेल्या १५१ मुलींना दिला शिक्षणासाठी आधार…
★ सहा टप्यात १५१ सायकलचे वाटप..
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर सत्य सातत्य, शिस्त, समर्पण ही चारसुत्री घेऊन महिला साक्षमीकरण या विषयावर मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. विशेषतः कोरोना काळात आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढवून त्यांनाही कोणाचातरी आधार आहे ही जाणीव करून देण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे १५१ सायकल वाटपाचा संकल्प करण्यात आला होता. या संकल्पाचे सहा टप्प्यात नियोजन करून त्यासाठी नागपूर, हिंगणा तालुक्यातील १५२ गावात गरजवंत मुलीचे सर्वेक्षण करून जवळपास १०२ गावातील गरजवंत १५१ मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले.
या संकल्पाची सुरुवात १९ फेब्रुवारी २०२२ ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी करून
पहिल्या टप्यात २५, महिला दिनाला दुसऱ्या टप्यात २५ गुढीपाडव्याला तिसऱ्या टप्यात २५, मातृदिनाला चौथ्या टप्प्यात २५ जागतिक सायकल दिनाला पाचव्या टप्प्यात २५ व दिनांक २० डिसेंबर २०२२ ला गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून आई सभागृह बुटीबोरी येथे समारोपीय कार्यक्रमात २६ मुलींना सायकली देऊन १५१ सायकल वाटपाची यशस्वी संकल्पपूर्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे संस्थापक राजे मुधोजी महाराज भोसले
उदघाटक ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड डीआरडीओचे ब्रिगेडियर एस पी सिंग प्रमुख उपस्थितीत देशमुख ट्रेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर देशमुख, वरिष्ठ पत्रकार विनायक इंगळे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश आंबटकर, नगरसेवक बबलू सरफराज
ही मंडळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात राजे मुधोजी महाराज भोसले म्हणाले की तळागाळापर्यंत जाऊन गोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणात कर्मयोगी कार्य करत आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य कसं करावं याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण या संस्थेने समाजाला दिलं आहे. यावेळी विचार मांडताना प्रभाकर देशमुख म्हणाले की
मी अनेक कार्यक्रमाला जातो परंतु पहिली वेळ आहे की या कार्यक्रमाची शिस्तप्रियता, प्रेमरूपी श्रीमंती पाहून माझ्या हृदयाला पाझर फुटला. मला कर्मयोगीचं नियोजन , त्यांची दूरदृष्टी समजून घ्यायची आहे. इतकं कर्मयोगीच कार्य प्रेरणादायी आहे.
यावेळी वरिष्ठ पत्रकार विनायक इंगळे गुरुजी म्हणाले की कोणी करोडपती इतकं मोठं काम करू शकत नाही ते काम आपलं पोट भरण्यासाठी बुटीबोरी येथे आलेल्या या मुलांनी गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचा वसा घेऊन अनेक गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवुन केलं आहे..
यावेळी या निराधार महिलांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की कर्मयोगी आम्हाला या भागात मोठा आधारस्तंभ ठरत आहे. येथे आम्हा गोरगरिबांना जो मानसन्मान मिळाला तो आम्हाला कधीच मिळाला नाही. आमची चहा पासून ते टेबल खुर्च्या लावून जेवणाची व्यवस्था करण्यात आली, हे सर्व पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजीव गावंडे, माजी सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त सुनंदा नारंजे, नगरसेवक मंदार वानखेडे, विजय मुडवाईक, विराग वैरागडे, पत्रकार सुभाष राऊत गुरुजी, पत्रकार संदीप बालवीर, सचिन सुर्यवंशी, मनोहर आडकीने, प्रमोद जुमडे ही मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती..
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली…